Marathi Story for Kids
एका नगरात विक्रमसिंग नावाचा राजा होता.तो फार जुलमी राजा होता.
प्रजा त्याच्या अत्याचाराला कटाळून नगर सोडून दुसऱ्या राज्यात जाऊ लागली होती.
त्याचा प्रधान चतुर आणि फार प्रामाणिक होता.
पण तो राजाला त्याच्या वागण्याबद्दल काही सांगू शकत नव्हता.
एकदा प्रधान रानात गेला, तेव्हा त्याला तिथे एक गोसावी जप करीत बसलेला दिसला.
त्याने गोसावीला नमस्कार केला, गोसाव्याने विचारलं कोण तुम्ही प्रधानाने स्वत:ची ओळख दिली.
Marathi Story for Kids
त्यावर गोसावी म्हणाला, त्या जुलमी राजाला ताळ्यावर आणणे हे तुमचं कर्तव्य आहे.राजाला त्यांची चूक लक्षात आणून देण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा.
प्रधान म्हणाला महाराज पण कसं सागायच राजाला, तुम्हाला काही उपाय सूचत असेल तर सांगा?
चतुर प्रधानाच्या डोक्यात एक कल्पना आली त्याने त्या साधूच्या कानात सांगितली.
गोसाव्याने त्याप्रमाणे वागण्याचे वचन दिले.
दसऱ्यादिवशी विक्रमसिंग राजचा दरबार भरला होता, तेवढ्यात एक सेवक आत आला आणि म्हणाला, महाराज पक्ष्याची भाषा जाणणारा एक साधू आला आहे,
महाजांनी त्याला आत यायला सांगितले. राजा प्रधानाला म्हणाला, प्रधानजी आज संध्याकाळी जगलात फिरायला जाताना या गोसावीबुवांना सोबत घेऊन जाऊ.
Marathi Story for Kids
संध्याकाळी ते तिघेही नगराच्या बाहेर पडत असताना वाटेत झाडावर बसलेले दोन पक्षी आपआपसात काहीतरी कुजबुज करीत असलेले राजाला दिसले.राजा त्याकडे बोट दाखवून म्हणाला, गोसावीबुवा हे पक्षी काय बोलताहेत?
गोसावी म्हणाला, पण महाराज ते मी तुम्हाला. सांगितलं तर तुम्ही मला मारून टाकाल.
राजाने तसे होणार नाही असे वचन दिले.
गोसावी म्हणाला, महाराजा जो डाव्या बाजुला बसला आहे त्याची मुलगी लग्नाची आहे.
उजव्या बाजुला बसलेला पक्षी हा परराज्यातून आला आहे.
त्याने आपली मुलगी या परराज्याच्या पक्ष्याच्या मुलाला देण्याची गोष्ट त्याच्याकडे काढली .
त्यावर वर पिता असलेला पक्षी म्हणतो, मुली बरोबर आंदण म्हणून शभर गाव देण्याची तुझी तयारी आहे का?
Marathi Story for Kids
राजा म्हणाला मग, तो पक्षी काय म्हणतो?गोसावी म्हणाला, तो म्हणतो अहो शंभर गावांचं काय घेऊन बसलात, इथल्या राजाचा जुलुम जर असाच चालू राहिला तर सर्व प्रजा हे राज्य-सोडून परराज्यात जातील मग सर्वच गावे रिकामे होतील.
मग ही पाचशेच्या पाचशे गाव जावयाला देईन.
Marathi Story for Kids
हे ऐकून राजाची मान शरमेने खाली गेली.त्या दिवसानंतर त्याच्या वागण्यात फरक पडू लागला.
तो एक चांगला राजा झाला.
शिकवण : कोणी फार चुकीचे वागत असेल तर त्याला समजेल अशा भाषेत त्याची चूक लक्षात आणून देणे आवश्यक असते. चूक लक्षात आल्यावर त्या व्यक्तीच्या वागण्यात फरक पडू शकतो.
Comments
Post a Comment