Marathi Kid's Story
महानतेचे व परोपकाराचे लक्षण
बोधकथा एक मुलगा रोज शाळेत शिकण्यासाठी जात असे . घरी त्याची आई होती , आईचे आपल्या या मुलावर जिवापाड प्रेम होते .
तिला त्याचा प्रत्येक हट्ट पुरवण्यात आनंद वाटे .
मुलगाही अभ्यासात हुशार व कष्टाळू होता.
एकदा त्यांच्या दारापुढे उभे राहून कोणीतरी ' माय , ओ माय ' असा आवाज दिला.
आवाज ऐकून मुलाने दार उघडले .
Marathi Kid's Story
बाहेर त्याला एक फाटक्या कपड्यातील कृश म्हातारी थरथरते हात पसरवून उभी असलेली दिसली.
ती म्हणाली , ' लेकरा , थोडी भीक दे रे. ' म्हातारीच्या तोंडचे ते दीनवाणे शब्द ऐकून मुलगा भावुक झाला आणि घरात जाऊन आईला म्हणाला , ' आई , एक गरीब बिचारी म्हातारी काही मागत आहे .
त्यावेळी घरात काहीच खाद्य पदार्थ शिल्लक नव्हता.
Marathi Kid's Story
आई म्हणाली , ' बाळा , आत्ता खायला देण्यासारखे काहीच शिल्लक नाही. हवे तर तांदूळ दे.'
पण मुलगा हट्ट करीत म्हणाला , ' आई , तांदळाने काय होणार आहे ? तू हातात जे सोन्याचे कंगन आहे ना तेच दे त्या बिचारीला.
मी मोठा होऊन जेव्हा पैसे कमावीन ना तेव्हा तुला दोन कंगन बनवून देईन.
'आईने आपल्या मुलाचा हट्ट पुरवण्यासाठी खरोखरच कंगन त्या म्हातारीला दिले.
कंगनाच्या रूपात म्हातारीला खजिनाच मिळाल्यासारखा वाटला .
कंगन विकून तिने कुटुंबातील मुलांसाठी धान्य कपडे इ. घेतले.
तिचा पती आंधळा होता.
Marathi Kid's Story
तिकडे तो मुलगा शिकूनसवरून मोठा विद्वान झाला.
त्याने खूप नाव कमावले.
एक दिवस तो आईला म्हणाला, ' आई , तुझ्या हाताचे माप दे.
मी तुला कंगन बनवून देतो , त्याला लहानपणी आईला दिलेले वचन आठवत होते.
पण आई म्हणाली , ' त्याची चिंता सोड , आता मी एवढी म्हातारी झाले आहे की , आता मला कंगन शोभून दिसणार नाही.
पण हो कलकत्त्यातील सारी गरीब मुले शाळा व वैद्यकीय उपचारासाठी दारोदार फिरत असतात.
त्यांच्यासाठी जिथे मोफत शिक्षण व उपचाराची सोय असेल अशी तू - एक शाळा आणि एक दवाखाना काढ.
आईच्या त्या महान व परोपकारी मुलाचे नाव होते , ईश्वरचंद्र विद्यासागर.
Comments
Post a Comment