Skip to main content

Marathi Story for Kids

Marathi Story for Kids

Marathi Story for Kids

हि बगदाद शहरातील खूप जुनी गोष्ट आहे. 
हारून रशीद नावाचा प्रसिद्ध बादशाह हॊता. 
एकदा काही कारणा वरून तो आपल्या वाजीरावर नाराज झाला. 
त्याने वजिराला व त्याच्या मुलाला तुरंगात टाकले. 
वजिराला एक आजार होता, त्याला थंड पाण्याने त्रास होत असे. 
त्याला सकाळी अंघोळ करण्यासाठी नेहमी गरम पाणी लागत असे. 
पण तुरंगात अशी सोय नव्हती. 
तिथल्या कैद्यांना ना थंड पाणीच दिले जात असे. 
फाजलला आपल्या वडिलांचा त्रास माहित होता, त्याने आपल्या वडिलांना गरम पाणी देण्यासाठी एक कल्पना केली. 

Marathi Story for Kids

तो रोज संध्याकाळी एका भांड्या मध्ये पाणी भरून कंदिलावर ठेवत असे . 
रात्रभर कंदिलाच्या उष्णतेने पाणी कोमट होत असे . 
त्याच पाण्याने त्याचे अब्बू सकाळी हात-तोंड धूत असत. 
पण त्या तुरुंगाचा जेलर खूपच निर्दयी होता. 
जेव्हा त्याने पाहिले की, फजल आपल्या वडिलांसाठी कंदिलावर पाणी गरम करतो तेव्हा त्याने रागाने कंदिलच तिथून काढून टाकले. 
फजलच्या वडिलांवर पुन्हा थंड पाण्यानेच हात-तोंड धुण्याची पाळी आली. 
त्यामुळे त्यांचा आजार वाढला. 

Marathi Story for Kids

फजलला आपल्या वडिलांचा त्रास पाहवला नाही. 
त्याने आणखी एक उपाय केला. 
संध्याकाळी तो लोट्यात पाणी भरून आपल्या पोटाजवळ धरून ठेवत असे. 
रात्रभर त्याच्या शरीराच्या उष्णतेने पाणी थोडेफार गरम होत असे. 
त्याच पाण्याने त्याचे अब्बू सकाळी हात-तोंड धूत. 
पण रात्रभर पाण्याने भरलेला लोटा पोटाजवळ धरून ठेवल्यामुळे फजल झोपू शकत नव्हता. 
कारण झोपेत लोटा पडण्याची त्याला भीती वाटत असे. 
अशाप्रकारे त्याने अनेक रात्री घालवल्या. 
त्यामुळे तो अशक्त झाला; 

Marathi Story for Kids

पण त्याने एक शब्दही काढला नाही. 
शेवटी जेलरला फजलच्या या पितृभक्तीविषयी समजले तेव्हा त्याचे मनही विरघळले. 
त्याने फजलच्या अब्बूसाठी तुरुंगात गरम पाण्याची व्यवस्था केली. 
ही गोष्ट बादशहाच्या कानावर गेली. 
तो ही वडिलांसाठीच्या फजलच्या त्यागभावनेने प्रभावित झाला. 
शेवटी त्याने दोघांनाही सोडून देण्याचा आदेश दिला. 

Moral : आपल्या वडिलांसाठी आपल्या मनात तीच त्याग व समर्पणाची भावना हवी जशी त्यांची आपल्यासाठी असते .

Marathi Story for Kids  

Comments

Popular posts from this blog

Marathi Story for Kids

Marathi Story for Kids एका नगरात विक्रमसिंग नावाचा राजा होता. तो फार जुलमी राजा होता. प्रजा त्याच्या अत्याचाराला कटाळून नगर सोडून दुसऱ्या राज्यात जाऊ लागली होती. त्याचा प्रधान चतुर आणि फार प्रामाणिक होता. पण तो राजाला त्याच्या वागण्याबद्दल काही सांगू शकत नव्हता. एकदा प्रधान रानात गेला, तेव्हा त्याला तिथे एक गोसावी जप करीत बसलेला दिसला. त्याने गोसावीला नमस्कार केला, गोसाव्याने विचारलं कोण तुम्ही प्रधानाने स्वत:ची ओळख दिली. Marathi Story for Kids त्यावर गोसावी म्हणाला, त्या जुलमी राजाला ताळ्यावर आणणे हे तुमचं कर्तव्य आहे. राजाला त्यांची चूक लक्षात आणून देण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा. प्रधान म्हणाला महाराज पण कसं सागायच राजाला, तुम्हाला काही उपाय सूचत असेल तर सांगा? चतुर प्रधानाच्या डोक्यात एक कल्पना आली त्याने त्या साधूच्या कानात सांगितली. गोसाव्याने त्याप्रमाणे वागण्याचे वचन दिले. दसऱ्यादिवशी विक्रमसिंग राजचा दरबार भरला होता, तेवढ्यात एक सेवक आत आला आणि म्हणाला, महाराज पक्ष्याची भाषा जाणणारा एक साधू आला आहे, महाजांनी त्याला आत यायला सांगितले. राजा प्...

पिता के लिए बेटे का त्याग | Moral Story

Marathi Kid's Story

Marathi Kid's Story महानतेचे व परोपकाराचे लक्षण बोधकथा एक मुलगा रोज शाळेत शिकण्यासाठी जात असे . घरी त्याची आई होती , आईचे आपल्या या मुलावर जिवापाड प्रेम होते .  तिला त्याचा प्रत्येक हट्ट पुरवण्यात आनंद वाटे .  मुलगाही अभ्यासात हुशार व कष्टाळू होता.  एकदा त्यांच्या दारापुढे उभे राहून कोणीतरी ' माय , ओ माय ' असा आवाज दिला.  आवाज ऐकून मुलाने दार उघडले .  Marathi Kid's Story बाहेर त्याला एक फाटक्या कपड्यातील कृश म्हातारी थरथरते हात पसरवून उभी असलेली दिसली.  ती म्हणाली , ' लेकरा , थोडी भीक दे रे. ' म्हातारीच्या तोंडचे ते दीनवाणे शब्द ऐकून मुलगा भावुक झाला आणि घरात जाऊन आईला म्हणाला , ' आई , एक गरीब बिचारी म्हातारी काही मागत आहे .  त्यावेळी घरात काहीच खाद्य पदार्थ शिल्लक नव्हता.  Marathi Kid's Story आई म्हणाली , ' बाळा , आत्ता खायला देण्यासारखे काहीच शिल्लक नाही. हवे तर तांदूळ दे.' पण मुलगा हट्ट करीत म्हणाला , ' आई , तांदळाने काय होणार आहे ? तू हातात जे सोन्याचे कंगन आहे ना तेच दे त्या बिचारीला.  म...